उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोव्हॅक्सीनच्या दुसज्या डोस साठी दि. 1 मे 2021 रोजी जवळपास दिड कलोमीटरची रांग सकाळी 5:00 वाजल्या पासून लागल्या होत्या.  पण प्रशासनाने कोणतेही पूर्व नियोजन केलेले नाही. याचा फटका नागरिकांना बसला आहे. कांही ठिकाणी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. या मुळे नागरिकांना विना कारण त्रास सहन करावा लागला. शहरामध्ये प्रत्येक वार्डात शाळा आहेत याठिकाणी लसीकरणाचे नियोजन केले तर सर्वांना सोईचे होईल व गर्दीवर नियंत्रण राहील, या मागणी संदर्भात जिलाधिकाऱ्यांना पत्रद्वारो करण्यात आली आहे. 

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,  लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी   सकाळी 7:00 वाजता आलेल्या व्यक्तीचा जवळपास 250 वा नंबर होता. याचा अर्थ 300 व्यक्ती ह्या सकाळी 7:30 वाजताच झालेल्या होत्या नंतर आलेल्या व्यक्तींना लस मिळणारच नव्हती.  त्यांना योग्य मार्गदर्शन नव्हते. फक्त एक दिशादर्शक फलक लावून त्यातुनही कांही योग्य मार्गदर्शन झाले नाही. कोव्हॅक्सीनचे फक्त 300 च डोस उपलब्ध होते. याची जाणीव प्रशासनाला असताना सुध्दा हे प्रशासनाने जाहीर करणे गरजेचे होते. ते न केल्यामुळे हजारो लोकांनी लसीकरणासाठी गर्दी केली याला जबाबदार कोण? आपल्याकडे पहीला डोस घेतलेल्या लोकांची पूर्ण माहिती आहे. पण प्रशासनाने कोणतेही पूर्व नियोजन केलेले नाही. याचा फटका नागरिकांना बसला आहे. कांही ठिकाणी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. या मुळे नागरिकांना विना कारण त्रास सहन करावा लागला. शहरामध्ये प्रत्येक वार्डात शाळा आहेत याठिकाणी लसीकरणाचे नियोजन केले तर सर्वांना सोईचे होईल व गर्दीवर नियंत्रण राहील. 

 आ. राणाजगजितसिंह पाटील,  आ. श्री. सुजीतसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाने कोवीड लसीकरणाच्या व्यवस्थापनेत सुधारणा करणेबाबत मा. जिल्हाधिकारी व शल्य चिकित्सक यांना पत्र देवून मागणी केली. यावळे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजसिंहा राजेनिंबाळकर, सरचिटणीस देवकन्या गाढे, कुलदिपसिंह भोसले, स्वप्नील नाईकवाडी, विशाल पाटील, प्रसाद मुंडे उपस्थित होते.  

 
Top