उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जागतिक परिचारिका दिन असताना देखील महामारीच्या काळात रुग्णांची अनमोल सेवा करणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षातील परिचारिकांचा भारतीय जनता युवा मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस  देवकन्या गाडे यांनी सन्मान केला.

दि.१२ मे रोजी देवकन्या गाडे जीवघेण्या महामारीत रुग्णांची निरागस व अविरतपणे सेवा करणाऱ्या परिचारिकांनी जागतिक परिचारिका दिनाचे कोणतेही कार्यक्रम साजरे न करता केवळ आणि केवळ आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देत आहेत. ही बाब आदरणीय राणाजगजितसिंह पाटील तसेच नितीनजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गाडे यांनी शासकीय जिल्हा‌ रूग्णालयातील कोरोना रूग्णांच्या सेवेत रात्रंदिवस काम करणाऱ्या परिचारिका तसेच डॉक्टर यांचा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने इतिहासातील शूरवीर महिलांचे पुस्तक भेट देत पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.  तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची पाहणी करून काही मदतीची गरज लागणार असेल तर आम्ही नक्की मदतीसाठी पुढे येऊ असे आश्वासन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.

 
Top