तुळजापूर / प्रतिनिधी- 

शहरातील जिजामाता नगर मधील ७० मुस्लीम  बांधवांना रमझान ईद साजरा करण्यासाठी नगराध्यक्ष अर्चनाताई   विनोद गंगणे व प्रियंका विजय गंगणे या गंगणे कुंटुबियांचा वतीने विविध साहित्य वस्तुंचे कीट गुरुवार दि १२ रोजी वाटप करण्यात आले.

शहरातील जिजामाता नगर मध्ये मोठ्या संखेने मुस्लीम बांधव दररोज काम करुन उदार निर्वाह करतात लाँकडाऊन मुळे रोजगार मिळत नसल्याने  अर्चना व प्रियंका या जावा-जावांनी मिळुन या भागातील १७ मुस्लीम बांधवांचा घरी जावुन रमझान ईद साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठा केला अर्चना गंगणे या युवा नेता विनोद गंगणे यांच्या तर प्रियंका गंगणे या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्या सौभाग्यवती आहेत.

 
Top