- कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांचा कर्मचारी, प्राध्यापकांशी संवाद
-उस्मानाबाद उपपरिसरचे संचालक डॉ डी के गायकवाड कार्यगट प्रमुख   

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोनानंतरचे आयुष्य ‘न्यू नॉर्मल‘ म्हणून ओळखले जात असून विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन व कर्मचारी, प्राध्यापकांसाठी कार्य गट स्थापन करण्याची घोषणा कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला केली.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ‘कोविड-१९‘ नंतरचे जीवन‘ या विषयावर उस्मानाबाद उपपरीसार येथील प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासाठी ऑनलाईन व्यााख्यानमाला घेण्यात येणार आहे. मानसशास्त्र विभागाच्या पुढाकाराने शुक्रवारी (दि.३०) पहिले व्याख्यान झाले. या मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्याख्यानमालेचे उदघाटन केले. या ऑनलाईन संवादात प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व विभागप्रमुख सहभागी झाले. यावेळी कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले, कोविडननंतरच्या परिस्थिती संदर्भात विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभुमीवर विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित समस्या, प्रश्न तसेच समुपदेशन करण्यासाठी ‘दोन कार्य गट‘ स्थापन करण्यात येणार आहेत. उस्मानाबाद उपपरिसर संचालक डॉ.डी.के.गायकवाड हे प्राध्यापकांच्या गटाचे प्रमुख राहणार आहेत. ते योग शिक्षक व आयुर्वेदाचे अभ्यासक देखील आहेत.  तर बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर हे कर्मचारी, अधिकारी कार्यगटाचे प्रमुख असणार आहेत. या गटात स्वेच्छेने काम करू इच्छिणाऱ्या कर्मचारी, प्राध्यापकांना सहभागी करून घेण्यात येईल. सर्वांचे आरोग्यविषयक तसेच अन्य प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न हा गट करेल. तसेच मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ.अर्पणा अष्टपुत्रे या विद्यार्थी ‘हेल्पलाईन‘च्या प्रमुख असणार आहेत. समवेत डॉ संदीप शिसोदे हेही विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत.  विद्यापीठ प्रशासन ‘कोविड नंतरच्या सर्व उपाययोजनांशी सामुहिक प्रयत्न करेल, महिनाभर विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल, असे यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घोषित केले. यावेळी कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी ‘प्लाज्मा दान करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी तर डॉ सुयोग अमृतराव यांनी आभार मानले.

अति विचार टाळून ‘नॉर्मल’ रहा : डॉ शिसोदे

या    वेळी डॉ.संदीप शिसोदे यांचे ‘मी माझे विचार आणि कोविड-१९ या या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, गेल्या वर्षभरापासून सारे जग ‘कोविड-१९‘ च्या आपातीच्या दहशतीखाली वावरत आहे. ‘कोरोना‘ची दुसरी लाट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणे गाजेचे आहे. सर्वांनी म्हणजे सकारात्मक विचार व दुर्दम्य इच्छाशकती या बळावर आपण या परिस्थितीला सामोरे जावे.


 
Top