प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्वतःहून केले निवेदन

परंडा / प्रतिनिधी -

कोविड१९च्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा विकास निधी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वइच्छेने, सहखुशीने एक दिवसाचे वेतन देण्यास तयार असले बाबतचे निवेदन व्हाटसप च्या माध्यमातून जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांना केले आहे.

कोविड-१९ च्या दुसऱ्या टप्प्यातील महामारीने संपूर्ण जग तसेच अवघा महाराष्ट्र हवालदिल झाला आहे,कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसा गणिक वाढत चालला आहे, क्षणात होत्याचं नव्हतं करत आहे, कुटुंबाच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत यामुळे शासनाला नाईलाजास्तव कडक निर्बंधासह लॉकडाऊन करावे लागले आहे.ते कधी थांबेल, पुढे किती दिवस चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.अशा स्थितीत हातावर पोट असणाऱ्या अनेक नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने डॉ.विजयकुमार फड  हे सजग आणि जागरूक राहून आपले कर्तव्य अगदी निष्ठेने, खंबीरपणे आणि प्रामाणिकपणे बजावत आहेत.

समाजाप्रती असलेली संवेदना नि सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेली प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना एक कर्तव्य म्हणून खारीचा वाटा उचलत एक दिवसाचे वेतन जिल्हा विकास निधी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एप्रिल २०२१ च्या वेतनातून स्वइच्छेने देण्यास तयार आहोत अशा आशयाचे निवेदन सादर केले आहे.

अशी माहिती राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत,जिल्हा समन्वयक फिरोज शेख, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गोरे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, सल्लागार भास्कर कांबळे, जिल्हा संघटक योगेश चाळक आदि यांनी दिली आहे.


 
Top