तेर/ प्रतिनिधी- 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गोरोबा काका यांचि तेर ता. उस्मानाबाद येथील वार्षिक यात्रा सोहळा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन चालू आहे. सर्व धार्मिक स्थळे शासनाच्या आदेशामुळे  बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तेर (ता. उस्मानाबाद) येथील श्री संत गोरोबा काका यांचा  7 मे ते 14 मे या कालावधीतील वार्षिक  सोहळा वं यात्रा रद्द करण्यात आली आहे. तथापि प्रथेप्रमाणे मंदिराचे पुजारी ,कर्मचारी, प्रत्येकी एक मानकरी, विणेकरी व झेंडेकरी विधीवत मोजकेच लोक मंदिरात परंपरेनुसार पूजा अर्चा करतील.7 मे ते 14 मे या कालावधीत कोणीही श्री .संत गोरोबा काकांच्या मंदिराच्या परिसरात गर्दी करू नये तसेच पालख्या दिंड्या आणू नयेत.वारकऱ्यांनी मुक्कामी राहू नये असे आवाहन श्री संत गोरोबा काका व शिव मंदिर ट्रस्टचे प्रशासक पी. बी. भोसले यांनी केले आहे.


 
Top