उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोनामुळे लॉक डाऊनच्या काळात सर्व वाहतूक आणि हॉटेल्स बंद आहेत.  शासनाच्या स्त्री रुग्णालयामध्ये बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांसोबतच्या नातेवाईकांची जेवणाची खूप मोठी अडचण निर्माण झाली. विशेषतः संध्याकाळच्या वेळी खायला काही मिळत नाही, याचा विचार करून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

दिनांक २५ मे २०२१ रोजी संध्याकाळी सात वाजता, स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर स्मिता गवळी आणि रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दुल लतिफ  यांच्या हस्ते ५० व्यक्तींना जेवणाचे डबे देऊन या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आदरणीय आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या संकल्पनेतून “मदतीचा एक घास” हा उपक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून राबविण्यासाठी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय संध्याताई सव्वालाखे यांनी पुढाकार घेतला आहे. 

जेव्हा लोक अडचणीत असतात, संकटात असतात तेव्हा त्यांच्या मदतीला नेहमीच काँग्रेस पक्ष पुढे येतो. म्हणून जोपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची अडचण चालू राहील तोपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे असे डॉक्टर स्मिता शहापूरकर म्हणाल्या.

या कार्यक्रमाला जिल्हा महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुरेखा काशीद, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेस कार्यकर्ते आशिष मोदानी, धनंजय राऊत आदी उपस्थित होते.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहदेव कसबे, शिवाजी पवार, तसेच स्त्री रुग्णालयाचे कर्मचारी, स्टाफ नर्स यांनी सहकार्य केले.

 
Top