उस्मानाबाद /प्रतिनिधी - लॉकडाऊनच्या काळात सर्वानाच अन्नधान्य उपलब्ध व्हावे. यासाठी स्वस्त धान्य दुकाना मार्फत फेब्रुवारी ते मे यादरम्यान ३८ लाख ‌३८ हजार ४४४ प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना ते धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

फेब्रुवारीमध्ये १ लाख ५४ हजार १९९ कुटुंबांना अंत्योदय अन्न योजने अंतर्गत गहू व तांदूळ ४ हजार ९६८.८० मॅट्रिक टन मंजूर करण्यात आली असून एफसीआयकडून ते उचलण्यात आले असून प्रति कार्ड २३ किलो गहू प्रती किलो २ रुपये दराने व १२ किलो तांदूळ ३ रुपये दराने ४ हजार ८३२.०२ मेट्रिक टन धान्याचे वितरण ई-पॉस मशीनच्या सहाय्याने करण्यात आले आहे.

तर तर अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांना प्रति महिना एक किलो साखर देय असून जानेवारी ते एप्रिल या कालावधीत २००.१५ मॅट्रिक टन मंजूर करण्यात आली असून त्यापैकी आजपर्यंत १३७.८१ मेट्रिक टन साखर प्रति किलो २० रुपये दराने वितरित करण्यात आली आहे. तर फेब्रुवारी ते मे या महिन्यात एपीएल शेतकरी योजनेसाठी ९ लाख ९६ हजार २४० लाभार्थ्यांना गहू व तांदूळ ४१०२.६० मेट्रिक टन मंजूर करण्यात आले असून या नियंत्रणाची एफसीआय कडून उचल करण्यात आली असून त्यापैकी ४०२५.१५ मेट्रिक टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री गरीब कल्याण अँड योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना एप्रिल व मे महिन्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन महिन्यात पैकी एका महिन्यासाठी ते धान्य मोफत देय आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मे व जून या कालावधीत अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या धान्य व्यतिरिक्त प्रति सदस्य प्रति महिना पाच किलो अन्नधान्य गहू तीन किलो तांदूळ दोन किलो या परिमाणात मोफत वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी मे महिन्याचे अंतोदय योजनेचे गहू व तांदूळ असे एकूण ५६१६.८५ मेट्रिक टन व जून महिन्यासाठी ५७८३.६० मेट्रिक टन नियतन मंजूर करण्यात आले असून मे महिन्याचे २९०८.१२ मेट्रिक टन अन्नधान्याचे ई-पॉस मशीनद्वारे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत १२ शिवभोजन केंद्र मंजूर असून या शिवभोजन केंद्रासाठी १ हजार २५० थाळी प्रतिदिन एवढा इष्टांक मंजूर असून या स्थानकात दि. १५ एप्रिलपासून पुढील एक महिना कालावधीसाठी दीडपट वाढ करण्यात आली आहे. या वाढीव इष्टांकाप्रमाणे १ हजार ८७५ प्रतिदिन थाळी देण्यात येत आहेत. यामध्ये  वितरीत करण्यात येत असलेली केंद्र व थाळींची संख्या पुढीलप्रमाणे उस्मानाबाद येथील बस स्थानक कॅन्टीन -१५०, शिवदीप उपहारगृह प्रशासकीयमध्ये मध्यवर्ती इमारत - १५०, मारवाड गल्लीतील हॉटेल सिद्धांत - १५०, गांधी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय जवळ राणाजी भोजनालय १५० व उस्मान टी हाऊस जवळ सप्तशृंगी बसवेश्वर सामाजिक संस्था - १५० तर तुळजापूर येथील बस्थानक समोरील हॉटेल न्यू सागर -१६५, उमरगा येथील हॉटेल रामकृष्ण - १८०, लोहारा येथील हॉटेल संदेश तहसील कार्यालयाजवळ - १५०, कळंब येथील सुनील मार्केट जवळील लक्ष्मी भोजनालय - १८०, वाशी येथील भैरवनाथ हॉस्पिटल समोरील हॉटेल माऊली - १५०, भूम येथील वेताळ रोडवरील हॉटेल वरद - १५० व‌ परंडा तहसील कार्यालया समोरील होटेल वैभव - १५० आशा एकूण १ हजार ८७५ थाळी प्रत्येक दिवशी गरजू व गरीब भुकेलेल्यांना देण्यात येत आहेत. दि. १ फेब्रुवारी ते १४ एप्रिल या कालावधीत प्रति थाळी ५ रुपये शुल्क आकारून ७५ हजार ७५ थळी वितरित करण्यात आलेले आहेत. तर दि.१५ एप्रिल पासून पुढील एक महिना या कालावधीत शिवभोजन थाळी मोफत वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतल्यामुळे 18मे च्या शासन निर्णयानुसार मोफत शिवभजन वितरणास मुदतवाढ देण्यात आली असून दि.१५ जून पर्यंत शिवभोजन थाळी मोफत वितरित करण्यात येत आहे. मोफत स्थळी चे वितरण सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक शिवभोजन केंद्रावर एका शासकीय कर्मचाऱ्याची शिवभोजन वितरण सुरू असलेल्या ठिकाणी सकाळी ७ ते ७ या कालावधीत उपस्थिती राहून तपासणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. दि.१५ एप्रिल ते दि.१८ मेपर्यंत १ लाख ३५ हजार २१५ थाळींचे मोफत वितरण करण्यात आले आहे.

 
Top