तुळजापूर / प्रतिनिधी- 

अक्षयतृतीया पार्श्वभूमीवर “माझा प्रभाग माझी जिम्मेदारी” या संकल्पनेतून  सुनील भाऊ चव्हाण विचारमंचच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4 मधील कुटुंबांना नगरसेवक  सुनील पिंटू संभाजीराव  रोचकरी यांच्या वतीने  प्रभागातील नागरिकांना आंबा फळासह दीड हजार रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तुचे किट गुरुवार दि.१३रोजी वाटप करण्यात आले.

या कीटचे वितरण तहसीलदार सौदागर  , काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील,तालुकाध्यक्ष अमर मगर,सज्जनराव साळुंके,आण्णा अमृतराव,अनंत कोंडो यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी युवक शहराध्यक्ष  लखन पेंदे, सुहास गायकवाड,करण साळुंके,शिवाजी अमृतराव,राहुल भालेकर,सचिन सुरवसे,बंटी कदम,अक्षय सुरवसे,सुदर्शना वाघमारे,राहुल जटाळ,अभिषेक साळुंके,ननू लसणे आदी उपस्थित होते. 

 
Top