उमरगा / प्रतिनिधी -

 मुन्शी प्लॉट परीसरातील  रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच या रस्त्यावर  सिमेंट रोड व नाली गटार नाही. त्यामुळे सदरचा रस्ता अतिक्रमणमुक्त करुन गटार व सिमेंट रस्ता करण्यात यावा अन्यथा १५ आॅगस्ट रोजी पती पत्नी आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सौ. ललिता मधुकर बिद्री  यांनी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वॉर्ड क्र. १६ मुन्शी प्लॉट येथील घर न. २६८ खुल्ला प्लॉट लगत सिमेंट रोडवर अतिक्रमण केले आहे. ३५ फूट रोड पूर्ण अतिक्रमण करून गायब केले आहे. घाण गटारीचे मच्छर चिरटे डुकराचे माहेर घर झाले आहे. म्हणून आमच्या कुटुंबातील सर्वाना डेंग्यू, मलेरिया, आणि आता सर्वाना कोरोणा झाला आहे. सदरील रस्ता १५ आॅगस्टपर्यंत अतिक्रमण मुक्त करुन येथे गटार व सिमेंट रस्ता करण्यात यावा अन्यथा १५ ऑगस्ट २०२१ रोजी आम्ही पती पत्नी दोघेही आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 
Top