उस्मानाबाद / प्रतिनिधी -
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ९ वर्षांनंतर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ढोकी पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रमेश श्रीपती काळे (५१, रा.पारधी पेढी, पळसप, ता. उस्मानाबाद) हा ९ वर्षापासून फरार हाेता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि पांडुरंग माने, पोना हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ आरसेवाड, जाधवर यांच्या पथकास तो गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच त्याला शुक्रवारी शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ढोकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.