उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

तुळजापूर तालुक्यातील धनेगाव येथे राहणारा राहुल सुनील भोसले (२४) यांच्या जवळ चोरीचा स्मार्टफोन असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी “चोरीच्या स्मार्टफोनसह आरोपीस दि. २१ मे रोजी पकडून बेंबळी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धनेगाव ( ता. तुळजापूर) येथे राहणारा राहुल सुनील भोसले,(24 ) हा चोरीचा स्मार्टफोन बाळगून आहे . या संदर्भात सपोनि श्री मनोज निलंगेकर, पोना दिपक लाव्हरेपाटील, कावरे, पोकॉ- अशोक ढगारे यांच्या पथकास गोपनीय खबर मिळाली  होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखाचे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील वरील पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन विचारपुस केल्यावर  त्याच्या जवळील स्मार्टफोन हा बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 24 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे समजले. तो स्मार्टफोन त्याच्या ताब्यात कसा आला या विषयी विचारल्यास तो टाळाटाळ करत असल्याने पथकाने नमूद स्मार्टफोन जप्त करुन आरोपीस पुढील कार्यवाहिस्तव बेंबळी पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.


 
Top