जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,  एसपी राजतिलक रोशन, डीएचओ डॉ. वडगावे आयसोलेशन सेंटरला भेट

 

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी सरपंच, दक्षता फाउंडेशन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.


उस्मानाबाद - ग्रामस्थांनी एकत्रितपणे कोरोनाचा मुकाबला करावा. कोरोनाची तीसरी लाट येण्याची मोठी शक्यता आहे. प्रशासन तुमच्या भक्कमपणे पाठीशी आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी बेंबळी येथे बोलताना दिली.
जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी सरपंच, दक्षता फाउंडेशन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे दक्षता फाउंडेशन, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने २५ बेडचे आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथील कामकाजाची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणूमंत वडगावे, तहसीलदार गणेश माळी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे उपस्थित होते.
उपसरपंच नितिन इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अभियानाची माहिती दिली.

 
आयसोलेश सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत दक्षता फाउंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारी व सूचना जाणून घेतल्या. यानंतर जिल्हाधिकारी दिवेगावकर म्हणाले की, सर्वांनी एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करावा. सद्यस्थितीत दुसरी लाट आहे. कोरोनाची तीसरी लाट येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थ, युवकांनी एकजुटीने याचा मुकाबला करण्याची गरज आहे. प्रशासनाकडून प्रत्येक बाबीबाबत पाठींबा देण्यात येईल. सोशल मिडियाच्या माध्यमातून येणाऱ्या कुठल्याही आफवावर विश्वास ठेवू नका व आफवा पसरवू नका व पोलिस तसेच आरोग्य प्रशानला वेळोवेळी सहकार्य करा, असे आवाहन यावेळी पोलिस अधीक्षक रौशन यांनी केले.
यावेळी सरपंच वंदनाताई कांबळे यांना जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी कोरोना लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या. शक्यतो ४५ वर्षापुढील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रवृत्त करावे असे सांगितले. उपसरपंच नितिन इंगळे यांनी यावेळी गावात शिक्षकाकडून व ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाची माहिती सांगितली. दक्षता फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण यांनी आक्सिजन बेड व आयसीयू बेडची बेंबळी येथे मागणी केली.  त्यांनी तात्काळ मागणी मान्य करत याविषयी संबधिताना आदेश दिले व एक महीण्याच्या आत सर्व सुविधा चालू होतील आसे सांगण्यात आले. दक्षता फाउंडेशनचे विश्वस्त उपेंद्र कटके व युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सलमान शेख यांनी आज तारखेला ग्रामीण रुग्णालयाचे काम पुर्णवस्थेत आले आसुन याला तात्काळ चालू करणे गरजेचे आहे असे निर्देशनास आणुन दिले. ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण यांनी डॉक्टर व आरोग्य स्टाफ वाढवण्यासंबधी  विनंती केली. तेव्हा त्यांची तात्काळ दखल घेउन मागणी मान्य केली. यावेळी बेंबळी गाव, दक्षता फौंडेशन व ग्रामपंचायत यांना वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती बालाजी गावडे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष  नितीन पाटील, सुनिल वेदपाठक, सचिव शामसुंदर पाटील, गुड्डू सोनटक्के, सय्यद आतीक, गोविंद पाटील, नंदकुमार मानाळे, बालाजी माने, रणजीत बर्डे, सपोनि मच्छिंद्र शेंडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित राठोड, डॉ. अमोल गावडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन खापरे, राजाभाऊ नळेगावकर, राजाभाऊ रसाळ, रोहित निकम, विद्या माने  जिंदाशा शहा, ग्रामसेवक मोतीराम करपे व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top