परंडा / प्रतिनिधी : -

  बुधवार दि.५ मे रोजी रोसा येथील चेकपोस्ट याठिकाणी कार्यरत कर्मचारी यांच्याकरिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष कल्याण बापु बेताळे यांच्या वाढदिवस निमित्त रमेश (तात्या) बारसकर, जिल्हा कोषाध्यक्ष, शिक्षक समिती, उस्मानाबाद यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका - परंडा, जि.उस्मानाबादच्या वतीने मास्कशिल्ड व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

दिवसरात्र कार्यरत राहून, रस्त्यावर उभा राहून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत आपली सेवा बजावणारे कोविड यौद्धे यांच्याकरिता सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्याच कर्मचारी बांधवासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,परंडा च्या वतीने सामाजिक औदार्य दाखवण्यात आले. 

याप्रसंगी शिक्षक समिती जिल्हा संपर्कप्रमुख रामदास होरे सर, जिल्हा उपाध्यक्ष युवराज खाडे सर, तालुका अध्यक्ष नागनाथ देशमुख सर व तालुका नेते मा.प्रमोद जगदाळे सर आदी उपस्थित होते.


 
Top