कळंब /प्रतिनिधी : - 

राज्यात 16 जानेवारी पासुन कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परंतु हळूहळू लाभार्थी वाढत आहेत.

सद्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. परंतु इतर लाभार्थ्यांचे काय?. त्यांना लस केंव्हा व कोठे मिळेल. कांहिंनी एक डोस घेतला आहे. काहिंचा दुसरा घेणे बाकी आहे. काहींची दुसर्‍या डोस ची मुदत संपत आली आहे तसा त्यांचा धिर सुटु लागला आहे. याचे उत्तर प्रशासना कडे नाही.

या वर पुढील उपाय सुचवितो.......

 सद्याचे लसीकरण चालू ठेवावे. त्यामध्ये थोडा बदल करून  आठवडय़ातील पांच दिवस  18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लस द्यावी. , आठवडय़ातील दोन दिवस  इतर लाभार्थ्यांना लस द्यावी,असे केल्याने सर्वांना लस मिळेल आणि लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यांचे बाहेर पडणे कमी होईल आणि कोरोना संसर्ग टळेल. तसेच लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे त्यासाठी लसीकरण सेंटर ची संख्या वाढविणे अपेक्षित आहे. 

यासाठी पत्रकार बंधु आणि प्रशासनाने समन्वय ठेवून जनतेची गैरसोय टाळावी, असे आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे यांनी आवाहन केले आहे.


 
Top