विविध कलमांतर्गत बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद

शेतरस्त्याचे वाद मिटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळण्याची गरज


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील कनगरा, समुद्रवाणी येथे शेतीच्या वादातुन झालेल्या मारहाणीत व जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे बेंबळी पोलिस ठाण्यात विविध कलामातंर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कनगरा येथे शेतशिवार रस्त्याच्या रहदारीच्या कारणावरून कनगरा येथील रहिवाशी व्यंकट महादेव इंगळे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी विशाल विठ्ठल इंगळे  यांच्या विरोधात व्यंकट इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विविध कलानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील समुद्रवाणी येथील रहिवाशी अभिमन्यु घुले व त्यांची पत्नी अनिता यांना जमिनीच्या वादावरून शेतात मारहाण करून   जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी अनिता घुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  मधुकर गोमदे, कमलाकर गोमदे, बालाजी गोमदे, सुहास गोमदे, मंगज गोगदे,प्रतिक घुल,कार्तीक घुले, कनिषा घुले यांसह अन्य 2 अनोळखी व्यक्ती विरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  दोन्ही घटनेचा पुढील तपास बेंबळी पोलिस करीत आहेत.

जिल्हाधिकारी म्हणाले शेतरस्त्याचा वाद मिटवा


बेंबळी येथे आयसोलेशन सेंटर पाहण्यासाठी आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की गावात व परिसरात असलेल्या शेत रस्त्याचा वाद मिटवण्यात यावा. यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार क्षेत्रस त्यांचा वाद मिटवले नंतर अशा प्रकारचे वाद परिसरात होणार नाहीत. यामुळे पोलिस प्रशासनानेही यासंदर्भात दक्षता घेण्याची गरज आहे.
 
Top