उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शहरातील तांबरी विभागातील जेष्ठ नागरिक कमल चंद्रकांत नायगांवकर वय 84 यांचे दि.9 मे रोजी दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी वरवंटी येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारा वर्षांपूर्वी त्यांचे दोन्ही घुडगे बदलले होते.  त्यांच्या पाठीमागे तीन मुले , एक मुलगी ,जावई,सुना,नातवंडे,पणतू असा मोठा परिवार आहे.

दंतशल्य चिकित्सक डाॅ.अजित नायगांवकर यांच्या चुलती,औषधाचे व्यापारी मुकेश नायगांवकर यांच्या त्या आई , शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे ओंकार नायगांवकर यांच्या आजी होत. धार्मिक प्रवृत्तीच्या कमल नायगांवकर यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


 
Top