उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशाच आज लसिंचा तुटवडा निर्माण झालाय. कोरोनाच्या भीतीमुळे, लसीकरण लवकर  करून सुरक्षा मिळविण्याकडे नागरिकांचा कल  वाढला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर अनियंत्रित व  तुफान गर्दी होऊन, रोगाचा फईलाव आणखी वाढण्याची चिन्हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी थांबविण्यासाठी, उपाय योजना करण्याची मागणी फोरम ऑफ उस्मानाबाद सिटिझन्स  ( फूक ) च्या वतीने जिल्हाधिकारी यंाच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

 कोरोनाच्या भीतीमुळे, लसीकरण लवकर  करून सुरक्षा मिळविण्याकडे नागरिकांचा कल  वाढला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर अनियंत्रित व  तुफान गर्दी होऊन, रोगाचा फईलाव आणखी वाढण्याची चिन्हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहेत. तसेच वयस्कर नागरिकांना लसीकरण केंद्रावर अनावश्यक चकरा माराव्या लागत आहेत.  म्हणून, लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध आहे किंवा नाही? लस कोणत्या रोजी / तारखेला उपलब्ध होईल? याबाबतची माहिती स्थानिक वर्तमान पत्तरातून  व उस्मानाबाद आकाशवाणीवरून अगोदरच प्रसारीत केल्यास, लस उपलब्ध नसताना   लसीकरण केंद्रावर होणारी अनावशक गर्दी टाळुन, रोगाचा फईलाव थांबावता येऊ शकेल. त्यामुळे  आरोग्य विभागाला याबाबत सूचना  देण्यात अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर एम.डी देशमुख, धर्मवीर कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 
Top