परंडा / प्रतिनिधी : - 

तालुक्यातील भोंजा हवेली येथे अर्सेनिक अल्बम-३० व संशमनी वटी ( गुडूचीघन वटी ) गोळ्या वाटप जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे तसेच भैरवनाथ शुगर कारखाना नबंर १ चे संचालक, जि.प.चेउपाध्यक्ष धनंजय सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद डाॅ.विजयकुमार फड (भा.प्र.से) आणि पंचायत समिती परंडा अधिकारी यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील प्रत्येक नागरीकांसाठी मोफत होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम-३० व संशमनी वटी (गुडूचीघन वटी) च्या गोळ्याचें भोंजा हवेली येथे ९५ कुटुंबांना वाटप करण्यात आले.या गोळ्या प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. कोव्हीड-19 करीता स्वतःपासून दुसऱ्यांना ञास न होता काळजी घ्यावी व वारंवार आरोग्य विषयी काळजी घ्यावी. शासकीय अधिकारी यांच्या सूचनांचे पालन करून कोव्हीड-19 ला आपण हरवून आपल्या कुटुंबास सुखरूप ठेवता आले पाहिजे. माझे कुटुंब माझी जबाबदारी घरीच रहा सुरक्षित रहा असा सल्ला गावकऱ्यांना दिला. 

गोळ्या वाटप वितरण वेळी अध्यक्ष श्रीराम भांदुर्गे, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेशदादा नेटके, बाळासाहेब जाधव, सुहास मुळे, निखिल मोरे, सुभाष ढवळे, मारूती जाधव, हरिचंद्र पोळके, देविदास सरवदे सह आदी उपस्थित होते.


 
Top