उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठान व सिद्धेश्वर स्पोर्टस क्लब वडगाव सि.आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय वडगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन वडगाव गावचे युवानेते अंकुश मोरे,पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव,सरपंच बळीराम कांबळे,उपसरपंच जयराम मोरे ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुळे,लक्ष्मीकांत हजारे,सुनिल पांढरे,सुरेश जानराव यांच्या हस्ते करुन उपस्थित रक्तदात्याना अल्पोपहार म्हणून केळी,बिस्कीट,चहा देण्यात आला.

यावेळी रक्तसंकलन करण्यासाठी सह्याद्री रक्तपेढी उस्मानाबाद यांच्याकडून रक्तदानाचे संकलन करुन गावातील तरुण युवकांनी व ग्रामस्थांनी भरपुर प्रमाणात प्रतिसाद देत ६२  शिवभक्तानी रक्तदान केले आहे.यावेळी आण्णासाहेब पांढरे,विश्वजीत गुरव,प्रमोद चादरे,आण्णा मोरे,बाळासाहेब मोरे,प्रकाश मोरे,महेश मोरे,हनुमंत मोरे,राहुल म्हेत्रे,सुधिर वाडकर,योगेश ताटे,किरण जाधव उपस्थित होते.तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी धीरज मोरे,सोमनाथ पाटील,ओमकार माळी,आशृबा हजारे,ओमकार मुळे,विकास गोरे,सचिन वाघमोडे,सोमनाथ कांबळे,चंद्रकांत मोरे,गणेश मंगरुळे,ज्ञानेश्वर माळी,नागेश माळी अंकुश काका मोरे युवा प्रतिष्ठाण व सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब वडगाव सी चे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी सह्याद्री हॉस्पिटल तथा सह्याद्री ब्लड बॅकेचे डॉ दिग्गज दापके यानी सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने “सामाजिक बांधिलकी” जोपासत आपण सर्व गावकरी ग्रामस्थ तसेच शिवभक्तानी या शिबिरात सहभागी होवुन रक्तदान केले त्याबद्दल आभार व्यक्त केले.

 
Top