उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जागजी ता. उस्मानाबाद येथे आज गुरुवारी दि, 13 मे रोजी तहसीलदार गणेश माळी   यांनी भेट देऊन कोरोणा संबंधी केलेल्या उपाययोजनाची माहिती घेतली व पुढील काळात कोरोना  संबंधी प्रतिबंध करणे यासाठी मार्गदर्शन केले. 

या अंतर्गत जागजी मध्ये   पुर्ण गावात  ग्रामपंचायत मार्फत सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी करण्यात आली आहे व गावातील प्रत्येक कुटुंबाला सँनेटायजर वाटप करण्यात आले आहे. तसेच गावात सर्वेक्षण करण्यासाठी ९ टीम केल्या असुन या प्रत्येक टीम मध्ये शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, ग्रा.पं सदस्य, स्वंयसेवक यांची नेमणूक केली असुन या प्रत्येक टीमला पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर देण्यात आले आहे.  टीम यांना गावातील ठराविक भाग  वाटप करून देऊन या कुटुंबाला रोज भेट देऊन त्यांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर ने तपासणी करून त्यांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. तसेच कोरोना पेशंट निघालेला भाग प्रतिबंधित करून तो परिसर सील केला आहे. या प्रमाने कोरोना विषयी ग्रामपंचायत कडुन विविध  उपाय योजना केल्याने सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. या केलेल्या उपाय योजनाविषयी गणेश माळी यांनी समाधान व्यक्त केले  या वेळी नानासाहेब पाटील , सरपंच लक्ष्मन बनसोडे , उपसरपंच वैजिनाथ सावंत , ग्रामविकास अधिकारी  सचिन वाघे , पोलिस पाटील सुभाष कदम- पाटील, सदस्य चंद्रकांत माळी, तलाठी कासराळे आर. एन, मुख्याध्यापक  बापूसाहेब मेंढेकर, बिडवे सर, आरोग्य अधिकारी  डॉ, दिव्या इंगळे, पोलिस कर्मचारी गुरुदेव माळी,    ग्रा.पं कर्मचारी सुभाष भांडवले, महादेव मगर, हेमंत मगर, लहू सावतर, सोमनाथ गवळी व  इतर हजर होते, 

 
Top