उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी युवा नेते अमित शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी ही निवड केली आहे. ऑनलाइन बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री संजय बनसोडे, पक्ष निरीक्षक तथा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांच्यासह पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

शिंदे यांनी यापूर्वी उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते तसेच अनेक समाजोपयोगी व पक्षीय कामात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. राजकारणाबरोबरच ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित आहेत.

उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाचा दौरा करून गाव व वॉर्ड तिथे राष्ट्रवादी शाखा सुरू करण्याचा व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प अमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. याबरोबरच विविध ठिकाणचे प्रश्न सोडविण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.


 
Top