उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरासाठी 168.81 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण प्रकल्पास ( भूमिगत गटारे व सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन )  नगर विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदू राजे निंबाळकर यांनी दिली असुन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हे काम होणार आहे. या कामासाठी राज्य सरकारकडून 75 टक्के 126.46 कोटी अनुदान तर नगर परिषदेचा 25 टक्के वाटा म्हणजे 42.15 कोटी असणार आहे, येत्या 7 दिवसात या कामाची निविदा प्रक्रिया होणार असून 3 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. उस्मानाबाद शहर स्वच्छ शहर या संकल्पनेसाठी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी भूमिगत गटारे व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची मागणी करीत पाठपुरावा केला होता अखेर त्याला यश आले असून सप्टेंबर महिन्यात या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे शहरातील घाणीचे साम्राज्य कमी होणार आहे. उस्मानाबाद शहराच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.

राज्यातील नागरी भागात मूलभूत व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्याचा दर्जा वाढविण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सुरू करण्यात आले या प्रकल्पात उस्मानाबाद शहराचा समावेश होण्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजे यांनी प्रस्ताव व प्रकल्प अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी राज्य सरकार पाठविला त्यास 11 मे रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. भविष्यातील गरजेनुसार मलप्रक्रिया व्यवस्था निर्माण करून सध्या निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया पहिल्या टप्प्यात होणार आहे. यात ट्रकमेन ,पंपिंग स्टेशन, मलशुद्धीकरण केंद्र व नालबंध याचा समावेश असणार आहे. आगामी 7 दिवसात या प्रकल्पाची निविदा काढण्यात येणार असून 3 महिन्यात कार्यादेश तर 91 दिवसांपूर्वी कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ करणे या योजनेत बंधनकारक आहे.

हा प्रकल्प उस्मानाबाद नगर परिषद मार्फत कार्यान्वयन करण्यात येणार आहे त्याच बरोबर काही सुधारणा बंधनकारक व वैकल्पिक करण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी भागातील सांडपाण्याचे पुनप्रक्रिया व पुनवापर करण्याच्या घटकांचा या योजनेत समावेश असणार आहे. या प्रकल्पाची देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक ते नियोजन नगर परिषद करणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित प्रभागातील मलवाहिन्याचा समावेश असलेला दुसरा टप्पा प्रकल्प स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे भूमिगत गटारे व सांडपाणी प्रक्रिया होणार आहे.

 
Top