कळंब / प्रतिनिधी

महसुल विभाग व वनविभागाचे उपसचिव तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबचे भुमीपुत्र संतोष भोगले यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले आहे. 

संतोष भोगले कळंब तालुक्यातील हिंगणगाव येथील रहिवासी होते. यांचा जन्म सन १९७९  लझाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंबाजोगाई येथे झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण लातुर येथील शाहू कॉलेज झाले त्यानंतर वेटरनरी डॉक्टर व एमपीएससीमधुन मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि प्रतीनियुक्तीने उपसचिव महसूल व वन विभाग मंत्रालय येथे काम पाहत होते. ते एक उत्कृष्ट मॅरेथॉन धावपटू होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक लोकांशी त्यांची वयक्तिक संबंधातून नाळ होती तर ते नेहमी लोकांना मदत करीत असत.

भोगले यांनी मंत्रालयातील पहिली पेपर लेस फाईल तयार केली, डिजिटल सात बारा चे काम केले व डिजिटल सहीचा सात बारा आणि ऑनलाईन फेरफार हे काम केले. मंत्रालय जळाल्यानंतर १८-१८ तास काम केले होते. त्यावेळी ते आय.टि विभागाचे उप सचिव होते. आधारचे महाराष्ट्राचे नोडल ऑफिसर म्हणून काम केले. दिनांक १ मे रोजी त्यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, चार बहिणी,एक भाऊअसा परिवार आहे.

 
Top