उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
एकीकडे कोरोना संसर्गाचा वाढता कहर व त्याची भीती तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आज लसीकरण मोहिमेत चांगलीच धावपळ झाली. ठराविक डोस उपलब्ध असल्याने लस घेण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी रात्री 2 पासुन लसीकरण केंद्रावर लस मिळेल की नाही या धास्तीने नंबर लावण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र उस्मानाबाद शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळाले.विशेष म्हणजे जिथे गर्दी कमी आहे अशा केंद्राची माहीती आरोग्य  विभागाने दिल्यामुळे अनेकांची फरफट थांबली  योग्य नियोजना मुळे कोठेही ओरड आली नाही   लसीकरणसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने लस दिली जाणार होती त्यामुळे नंबर लावण्यासाठी अनेक जण रात्री व भल्या पहाटे केंद्रावर आले होते.कोवॅक्सिन लसीचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांना दुसरा डोस मिळालेला नव्हता.
19 मे रोजी बुधवारी 9 लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जात आहे.आज एकूण 4 हजार 450 डोस दिले जाणार आहेत. ज्या नागरिकांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन 28 दिवस झाले आहेत त्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. हा डोस केवळ 45 वर्षाच्या पुढील नागरिक व फ्रंट लाईन वर्कर यांना दिला जाणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात 1 हजार डोस दिले जात आहेत तर आयुर्वेदिक महाविद्यालयात केवळ फ्रंट लाईन वर्कर यांना 600 डोस दिले जात आहेत .उस्मानाबाद शहरातील रामनगर व वैराग रोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रवर प्रत्येकी 300 डोस, पोलीस रुग्णालयात केवळ पोलीस व न्यायालय विभागातील अधिकारी कर्मचारी यांना 250 डोस तर उपजिल्हा रुग्णालय कळंब, तुळजापूर, उमरगा व परंडा या चार ठिकाणी प्रत्येकी 500 प्रमाणे डोस दिले जात आहेत. आजचे लसीकरण हे केवळ 45 वर्षाच्या पुढील नागरिक व फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी दुसरा डोससाठी होत आहे. कोवॅक्सिन लसीचा पुरवठा कमी असल्याने तुटवडा जास्त असून अनेक नागरिकांची दुसऱ्या डोसची मुदत संपूनही लस मिळालेली नव्हती
जिल्हा रुग्णालयात 1 हजार डोसचे टोकन वाटप केल्यानंतर अनेकांना दुपारी  12 वाजताच परत जावे लागले. आगामी काळात लस उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता व विनाकारण गर्दी न करता काळजी घ्यावी आणि नियमांचे पालन करावे, प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील व कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले आहे .
 
Top