उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

सध्या देशभरात कोरोना जैविक विषाणुचा प्रार्दुभाव असुन नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,कडक उन्हाळा असुन उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आणि कर्तव्य बजाविणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना युवा नेतृत्व मृत्युंजय माणिक बनसोडे यांनी त्यांचे आई वडिल बुद्धवासी माजी नगराध्यक्षा रेविताताई माणिक बनसोडे व बुध्दवासी नगरसेवक माणिक बनसोडे यांच्या स्मरणार्थ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दि.17/05/2021 पासुन चालु केले असून आज तिसरा दिवस आहे,हा उपक्रम कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईपर्यंत शासनाच्या नियमांचे पालन करुन केला जाणार असुन दोन दिवसांपुर्वी त्यांनी अन्नदान केले होते.

यावेळी उपस्थित मान्यवर व कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, मान्यवरांनी पाण्याचे महत्त्व सांगुन पाणी जपुन वापरा व कोरोना संबंधित शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा याबाबत मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक नाईकवाडी,निवासी तहसिलदार तुषार बोरकर,डॉ.सचिन गायकवाड,नगर सेवक  सिध्दार्थ बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,अण्णा बनसोडे,धनंजय वाघमारे,मृत्युंजय बनसोडे,नाना बनसोडे,संजय गजधने,रमेश गंगावणे,रुधिर गायकवाड,राजाभाऊ बनसोडे,निखिल बनसोडे, धनंजय गायकवाड,रितेश बनसोडे, नितिन जानराव,बापू गायकवाड,आनंद बनसोडे,संघपाल शिंगाडे रोहित बनसोडे,अन्य इतर उपस्थित होते.

 
Top