तुळजापूर /  प्रतिनिधी- 

तालुक्यातील तिर्थखुर्द येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाची याञा रविवार दि.९ रोजी कोरोना महामारी पार्श्वभूमीवर  साधेपणाने  साजरी करण्यात आली. चैञ महिन्यात श्री भैरवनाथ याञा तिर्थखुर्द येथे मोठ्या उत्साहात केली जाते. 

रविवार दि. ९ रोजी पहाटे  तिर्थखुर्द येथील ग्रामस्थ श्री भैरवनाथ मंदीरात गावातुन दंडवत घालत गेल्या नंतर श्री भैरवनाथ  मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्या नंतर भैरवानाथ मुर्तीस पोशख घालण्यात आल्यानंतर आरती करून  नैवध दाखविण्यात आला . सांयकाळी मोजक्याच मानकरी वर्गासह भैरवनाथाची काटी पालखी मिरवणूक काढण्यात आली व  महाप्रसादाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.  यंदा भैरवनाथ याञा उत्सव रद्द केल्याने बाहेरगावचा मोठ्या संख्येने येणारा भाविक तिर्थखुर्द येथे फिरकलाच नाही. 

 
Top