परंडा / प्रतिनिधी :-

 महाराष्ट्र सह उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा संसर्ग दिवसेन् दिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव ची ब्रेक द चैन तोडण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाने शनिवार दि.८ मे ते १३ मे गुरुवार पर्यंत संपुर्ण उस्मानाबाद  जिल्ह्यात कडक निर्बंध सह जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे .

शहरातील या जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा देणारे दवाखाने, मेडीकल,चष्मा दुकान, शासकीय विमा कार्यालय यांना शासनाने दिलेल्या वेळे नुसार ठेवण्याची परवानगी देण्यात आलीआहे. 

अत्यावश्यक असलेली किराणा, भाजीपाला सह सर्व अस्थापणे,शहर हद्दीतील पेट्रोल पंप पुर्ण पणे  बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्याआदेशाच्याअनुशंगाने परंडा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यूची येथील महसुल,पोलिस, नगरपरिषद प्रशासना कडून कडक स्वरूपातअमल बाजावणी सुरु करण्यात आली आहे.

 येथील पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे, नायब तहसिलदार मिलींद गायकवाड,नायब तहसिलदार गणेश सुपे,नायब तहसिलदार सुजित वाबळे,व नगर परिषद यांच्या पथकाने जनता कर्फ्यू आदेशाचे उलंघन करणाऱ्यां नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग शहरासह ग्रामीण भागात  मोठया प्रमाणात रुग्णांची वाढ होत असल्याने उपजिल्हा रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याने रुग्णास दाखल व औषध उपचार करण्यास व बेड मिळण्यास रुग्णांना मोठी अडचण निर्माण होत आहे.तरआरोग्य यंत्रनेस रुग्णाना औषध उपचार करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.अशी भयान परिस्थीती तालुक्यात निर्माण झाली आहे. दि.८ मे पर्यत परंडा तालूक्यात कोरोनाचे ४९४ रुग्ण आसुन परंडा उपजिल्हा रुग्णालयात ६० रूग्णावर तर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृह येथील कोवीड सेंटर मध्ये ६९ रुग्णावर तर संत मीरा स्कुल येथील कोवीड सेंटर मध्ये ५५ अश्या एकुन १८९  कोरोना रुग्णावर उपचार सुरू असुन ३०५ रुग्णावर गृह विलगीकरण करून अरोग्य विभाच्या वतीने उपचार करण्यात येत आहेत.कोरोना वर मात करून १२ रुग्णांना औषध उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.कोरोना व सारी रुग्ण मुत्यूच्या आकड्यात दिवसेन दिवस वाढ होत असल्याने आज पर्यंत ९८ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सारी रोगा मुळे १३ जणांचा मुत्यूचा समावेश असून आज पर्यंत एकूण१११ जणांचा उपजिल्हा रुग्णालयात उपचार दस्म्यान मृत्यू झाला आहे. दिवसेन दिवस वाढ होत असुन आज पर्यंत ९८ रूग्णांचा कारोना मुळे तर सारी मुळे १३ असे एकुन १११ रूग्णांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला आहे.

  परंडा तालूक्यातील १० गावे मागील तीन दिवसा पूर्वी हॉट स्पॉट झोनमध्ये होती.कोरोना चा वाढता  प्रादूर्भाव पाहता रुग्णाचा काही गावात सतत वाढ होत असल्याने आज मित्तीस तालुक्यातील १६ गावे हॉट स्पॉट झोनमध्ये आली आहेत.या मुळे आरोग्य विभागावर मोठा ताण आला असून डॉक्टरांची कमतरता भासत असल्याचे दिसून येतआहे. उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात असताना देखील तहसील,पोलीस,नगरपरिषद प्रशासन आपली तत्परता दाखवत असून त्यांच्या वर ही ताण पडला आहे.


 
Top