उस्मानाबाद /  प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील रहिवाशी तथा हनीवेल लिमिटेड, पुणेचे बिझनेस हेड,  सुनील माणिकराव नवले, (वय ५१ ) यांचे 9  मे २०२१ रोजी सकाळी १०.30  वाजता रूबी हॉल हॉस्पिटल पुणे येथे निधन झाले.

बीपी आणि कोविड पॉझिटिव्हमुळे २१ एप्रिल २०२१ रोजी रुबी हॉलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते  ते स्व. माणिकराव नवले, चोरखळी यांचे दुसरे पुत्र आणि तुळजापूर येथील विष्णुपंत पैलवान यांचे जावई आणि डॉ.अरविंद नवले व कै.प्राध्यापक संजय नवले यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात  पत्नी-मधु, दोन मुली  , मुलगा , एक भाऊ आणि एक बहीण आणि चुलते मेहुणे, पुतणे असा परिवार आहे. 

सुनिल नवले यांच्या  निधनामुळे उस्मानाबाद तुळजापुर कळंब व हनीवेल कंपनी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

अनेकांच्या मदतीला धाऊन जाणारे व सामाजिक कार्यात सक्रीय योगदान देणारे सुनील नवले यांच्या निधना मुळे हळहळ व्यक्त केली जात आहे . त्याच्या पार्थिवावर पुणे शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


 
Top