उमरगा / प्रतिनिधी-

 तलमोड सिमा तपासणी नाक्यावर गाडीची तपासणी केली असता ४ प्लास्टिक गोण्यात ७८.७३५ किलो गांजा ७ लाख ८७ हजार ३५० रुपये किमतीचा गांजासह १० लाख ९२ हजार ३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अन्य दोन आरोपीनी अंधाराचा फायदा घेऊन धुम ठोकली. ही घटना सोमवारी रात्री १२ च्या सुमारास घडली आहे.

 महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे  उस्मानाबाद जिल्हा सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच आंतरजिल्हाही सीमा सील  पोलिसांनी  केली आहे. त्यात  उमरगा तालुक्यात तलमोड , कसगी व कवठा या तीन ठिकाणी बॉर्डर चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. सीमावर्ती भागात कायदा व सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली. त्या ठिकाणी २४ तास नाकाबंदी करण्यात येत आहे. सोमवारी (दि.३) पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी लॉक डाऊनचा निमित्ताने बॉर्डर चेक पोस्टला भेट देऊन मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून रात्र पाळी ड्युटीवर असलेले पोलिस काॅन्स्टेबल एस एम उंब्रे, एस एम घुले, होमगार्ड राठोड , चौधरी हे सक्त नाकाबंदी करत असताना रात्री बारा वाजणेच्या सुमारास चेक पोस्ट वर अशोक लिलॅंड कंपनीची एम एच १४- एच जी ६५१५ ही बंद बॉडीच्या वाहनाची तपासणी केली असता ४ प्लास्टिक गोण्यात एकूण गांजाचे वजन केले असता. ७८ किलो ७३६ ग्रॅम भरले असून त्याची किंमत ७ लाख ८७ हजार ३५० रूपये एवढी होत आहे. यामध्ये गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली अंदाजे ३ लाख रुपये किंमतीची  आहे पोलीसांनी जप्त केली. एकुण १० लाख ९२ हजार ३५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व वाहन चालक प्रकाश नरेंद्र बेहेरा वय २२ वर्ष रा. शिरोळी ता. खेड , जिल्हा पुणे यास ताब्यात घेण्यात आले. तर अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी फरार झाले आहेत. याकामी पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव , सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पोलिस उपनिरिक्षक अमोल मालुसरे, पोलीस अमलदार एस एम उंब्रे,एस एम घुले, अतुल जाधव, मिलिंद साकले ,बाबासाहेब कांबळे शुभम दिवे , होमगार्ड राठोड, चौधरी, जलसंपदा विभागाचे अभियंता अनिल पोवाडकर , विक्रम बाळेकर यांनी पार पाडली आहे. गुन्ह्याची नोंद मंगळवारी झाली आहे पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अमोल  मालसुरे हे करत आहेत

 
Top