तुळजापूर / प्रतिनिधी- 

 मराठा आरक्षणाला  स्थगिती आल्यामुळे बुधवार दि.५रोजी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच मराठा समाज आरक्षण बाबतीत  बाजू व्यवस्थित  न मांडल्याने आरक्षण पासुन मराठा समाजाला वंचित राहावे लागल्याचा आरोप करीत  बसस्थानक चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी काळ्या फित बांधुन   केंद्र व राज्य सरकार च्या विरोधात घोषणा देवुन   केंद्र सरकार राज्य सरकारचा  जाहीर निषेध व्यक्त केला.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक जिवनराजे इंगळे, छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, कुमार टोले  आण्णासाहेब क्षिरसागर, आबासाहेब कापसे, पप्पु इंगळे, जगदाळे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

 
Top