तुळजापूर / प्रतिनिधी : -

भारतीय स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय लातूरला नेण्याचा घाट घातला जात असून, हा उस्मानाबाद जिल्ह्यावर अन्याय आहे. जनतेच्या सोयीसाठी स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय उस्मानाबाद येथेच करण्याची मागणी शिवसेनेचे नेते सुधीर कदम यांनी केली आहे. याप्रकरणी जिल्हा नेतृत्वाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या चिफ जनरल मॅनेजरला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले स्टेट बँकेचे विभागीय कार्यालय जागेच्या कारणावरून लातूरला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सामान्य जनतेला लातूरला जाण्या-येण्याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. स्टेट बँकेच्या विभागीय कार्यालयात १०० कोटी रूपयांची प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार असल्याने विभागीय कार्यालय जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे. या प्रश्नावर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.


 
Top