उस्मानाबाद / प्रतिनिधी-

समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स येथे शिवसेना, पवनराजे फाऊंडेशन यांच्यावतीने व इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सहकार्याने 125 बेडचे जंम्बो कोवीड सेंटर मध्ये शहरी व ग्रामीण भागातील वाढत असलेल्या रुग्णांचे प्रमाण पाहता त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत हा उद्देश घेऊन हे कोवीड सेंटर सूरु करण्यात आले आहे. 

 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर व आयएमएचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या कोविड सेंटर मध्ये येणाऱ्या रुग्णावर अगदी मोफत उपचार करण्यात येत आहेत. औषधापासुन सर्व खर्च हे कोवीड सेंटर करत आहे. तसेच रुग्णांना मोफत सकाळी नास्टा, दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे. येथील उपचारासाठी आयएमएच्या तज्ञ डॉक्टराचे सहकार्य लाभले असुन रुग्णांना येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

 हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिकवणीवणी आधारावर चालणाऱ्या शिवसेना पक्षाच्या वतीने 80 टक्के समाजकारणाचे सुत्र मानुन कोरोना महामारीच्या काळात जनतेला मदत व्हावी यासाठी शिवसेना व पवनराजे फाऊंडेशनच्यावतीने शहरात 125 बेडचे सुसज्ज कोवीड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. दि.05 मे रोजी कै.पवनराजे स्मृती कोविड सेंटर मध्ये मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या #राघुचीवाडी ता.उस्मानाबाद येथिल 80 वर्षांच्या सीताबाई बुसणर आजींनी कोरोनावर मात करून सुखरूप घरी गेल्या आहेत. आजींनी जाते वेळेस कोविड सेंटर मधील सुविधा बद्दल आभार मानले.

 कोरोना रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत असल्याने १२५ बेड पैकी ५० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दुर करण्यासाठी हे कोवीड सेंटर अधिक उपयोगाचे ठरत आहे. 


 
Top