उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील काही रस्त्यांची अवस्था खूपच खराब झाली होती. आजतागायत सदर रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत कोणतीही दखल घेतली जात नव्हती. रस्त्यांवरील वाहणारे सांडपाणी व तुंबलेली गटारे यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रस्ता उखडून गेल्याने जागोजागी खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी  वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती,वयोवृद्ध नागरिकांना चालणे अवघड होते सदर मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात केलेल्या नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्या योग्य पाठपुराव्यामुळे उस्मानाबाद शहरातील रस्ते व नाल्यांच्या विविध कामासाठी रुपये ५ कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. 

या कामासंदर्भात शिवसेना उपनेते, आ.प्रा.डॉ. तानाजी सावंत मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख, उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.कैलास घाडगे-पाटील तसेच उस्मानाबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष  मकरंद  राजेनिंबाळकर यांनी राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री  एकनाथजी शिंदे यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी निधी मागणी करुन पाठपुरावा केला होता.अशी माहीती शिवसेना गट नेते सोमनाथ गुरव यांनी दिली

यानुषंगाने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून   उस्मानाबाद शहरातील नगर पालिकेस वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे,या निधी मधून प्रामुख्याने  शहरातील प्रभाग क्र.२. मधिल   रामा २३८ ते शिवणारायनी इंटरप्रायजेस ते रामा महामार्ग ५२ पर्यन्त सिमेंट कॉंक्रिट रस्ता व नाली करने (शांतिनिकेतन कॉलनी मधील रस्ता ),   बँक कॉलनी ते रामा महामार्ग ५२ पर्यन्त रस्त्याची सुधारणा करणे (पूर्ण जुना उपळा रोड), महात्मा गांधी नगर येथे रस्ता व नाली करणे,  समर्थ नगर व केशव नगर येथे सिमेंट कॉंक्रिट रस्ता व नाली करणे या कामांसाठी ५ कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे शहरातील रस्ते व नाल्यांच्या समस्येतुन जनतेची सुटका झाली आहे.


 
Top