तुळजापूर / प्रतिनिधी - 

पुढाऱ्यांच्या भुलथापांना समाज आता बळी पडणार नसल्याचे स्पष्ट करुन मराठा समाज बांधवांचे मते जाणुन ते केंद्र व राज्य सरकारच्या राज्यकर्त्या पुढे मांडुन केंद्र व राज्य सरकारला जाब विचारणार असल्याचे प्रतिपादन खासदार छञपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण संदर्भात जिल्हयातील मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मराठा समाजातील संघटना प्रतिनिधीशी चर्चा करताना केले.

सोमवार दि.२४ रोजी राञी  येथील शासकीय विश्रामधाम येथे प्रथमता कायदेतज्ञ, डाँक्टर, वकील , उद्योजक, प्राध्यापक,  मराठा समाजाच्या  विविध संघटना पदाधिकाऱ्याचे मराठा आरक्षण संदर्भात पुढे काय करावे या बाबतीत मते ऐकुण घेतले. यावेळी मराठा समाजाला दिलासा देणारे निर्णय घेण्याचे राज्याला अधिकार आहेत ते घ्यावे प्रामुख्याने निर्णय घ्यावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फिस माफी सुविधा,  बिनव्याजी कर्ज तात्काळ  उपलब्ध करुण द्यावेत, आता सर्वञ  खाजगीकरणाचा बोलबाला आहे. खाजगीकरण झाल्यावर आरक्षण  फायद्याचे ठरणार का ? या बाबतीत मान्यवरांनी विचार मांडले.

सर्वांचे मनोगत ऐकुण घेतल्यानंतर खा. संभाजीराजे बोलताना म्हणाले की, मी मराठा समाजातील विविध घटकातील सर्वाची भेट घेणार आहे. अगदी गायकवाड कमिशन मधील मंडळीशी ही सगळ्यांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविणार आहे,इतर राज्यात आरक्षण वाढ मग महाराष्ट्रात आरक्षण वाढ बाबतीत मराठा समाजावर अन्याय का ? असा सवाल करुन कायदा  जनतेसाठी असतो त्यामुळे आरक्षण बाबतीत घटना दुरुस्ती करुन आरक्षण कोटा वाढवुन तो मराठा समाजाला द्या म्हणजे कुणावरही अन्याय होणार नाही,असे यावेळी म्हणाले.रस्त्यावरची लढाई जिंकलो माञ कायदेशीर लढाई हरलो याची खंत व्यक्त यावेळी केली .

यावेळी उद्योजक अभिजीत पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड धीरज पाटील,  अँड विश्वजीत शिंदे, विधीज्ञ अँड तानाजी जगताप, अँड गुंड, श्रीतुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष   सज्जन सांळुके,  छावाचे महेश  गवळी, औदुंबर  जमदाडे, रोहीत पडवळ,अण्णासाहेब क्षिरसागर, अँड घोरपडे, डाँ सुजित  मगर,  डाँ जहागिरदार, डाँ अनंत कदम,  प्रा. विवेक गंगणे, अजय सांळुके, अर्जून सांळुके, प्रशांत सोंजी , प्रशांत  इंगळे,  प्रशांत अपराध सह वकील, डाँक्टर, प्राध्यापक पञकार प्रतिष्ठात व्यापारी उपस्थित होते. 

 
Top