तुळजापूर / प्रतिनिधी- 

तुळजापूर-ग्रामीण भागात  वाढत जाणाऱ्या  कोरोनाचावाढत्याप्रादुर्भाव  पार्श्वभूमीवर  मराठवाडा च्या सरहद्द  वर असणाऱ्या जळकोट येथे कोवीड सेंटर सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत हंगरगा नळ, बोरगाव,नंदगाव, सलगरा मड्डी,सिदंगाव,कुन्सावळी,आलियाबाद, रामतीर्थ,आदि गावाचा समावेश आहे.जळकोट गावची लोकसंख्या दहा हजार चा आसपास असुन . दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोराेणाच्या या महामारीत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोवीड पाॅजिटि्व्ह साधारण पेशंट साठी जळकोट येथे कोवीड सेंटर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील यांनी केली होती.या मागणी ला तात्काळ प्रतिसाद देत तुळजापूर चे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी जळकोटला  भेट देऊन येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्याची पाहणी केली. व परस्थितीचा आढावा घेतला.तसेच  कोवीड सेंटर साठी काय काय उपाययोजना करायच्या त्यासाठी सुचना केल्या.

यावेळी ‌ तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण,  मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, सरपंच पाटील अशोक पाटील माजी सरपंच भिवा इंगोले, रा कदम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील माने, शिवराम कदम,प्रविण कदम, लहु कार्ले , विशाल जाधव ,वैद्यकीय अधिकारी डॉ विष्णू सातपुते उपस्थित होते.

 
Top