तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील कामठा येथील प्रगतीशिल शेतकरी रामकृष्ण शामराव जमदाडे ( ७८ )यांचे रविवारी दि. 2रोजी  पहाटे २  वाजता  निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली  असा परिवार आहे.कै रामकृष्ण जमदाडे हे वारकरी संप्रदायातील होते तसेच ते प्रगतीशिल शेतकरी होते व त्यांना शेती क्षेञात केलेल्या अमुल्य योगदाना बद्दल त्यांना अनेक कृषी पुरस्कार मिळाले होते. तुळजापूर पंचायत समिती उपसभापती शरद जमदाडे यांचे ते वडील होते.त्यांच्यावर कामठा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला .

 
Top