उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे मंजुर झालेल्या   वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रवेश जून २०२२ पासून सुरू होणार आहे. त्या दृष्टीकोनातून शासकीय नियमाप्रमाणे व आरोग्य विज्ञान परिषदेच्या समन्वयाने वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करण्यात येईल. सध्या असलेल्या शासकीय रूग्णांलय व परिसरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभाग सुरू करण्यात येतील. तर उर्वरीत विभागासाठी येत्या एक महिन्यात आयटीआय किंवा एमआयडीसी मधील जागा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

३१ मे २०२१ रोजी अमित देशमुख उस्मानाबाद येथे आले होते. सायंकाळी ५ वाजता त्यांनी कोव्हीड-१९संदर्भात आढावा बैठक घेतली.त्या नंतर पञकार परिषद घेतली  या बैठकीला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील, पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी हाणमंत वडगावे, जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.धनंजय पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे नव्या वैद्यकीय  महाविद्यालयाचे डीन शेखर जरबेकर आदी उपस्थित होते. 

या बैठकीत मंत्री देशमुख यांनी कोरोना चाचण्या वाढविण्याची सूचना करून या जिल्हयाचा मृत्यूदर कसा कमी करता येईल. याकडे लक्ष्य देण्यास सांगितले. येणाऱ्या तिसऱ्या लाटे विषयी बोलताना ग्रामीण भागात सुध्दा वेंटीलेटरची सोय करा, असे सांगितले. ९७ टक्के लहान मुलांना सौम्य लक्षणे दिसतील. ते घरीच बरे होऊ शकतात, असे सांगून ज्या ११ वर्षांपर्यतच्या लहान मुलांना इतर कांही आजार असतील तर त्यांच्याकडे मात्र काळजीपुर्वक लक्ष देणे आवश्यक आहे, असे सांगितले.

मी राजकारण करीत नाही

लसीचा पुरवठा आवश्यतेनुसार झाल्यास तीन महिन्यात राज्यात पुर्ण लसीकरण होऊन जाईल. परंतू केंद्र सरकारकडून आवश्यकतेनुसार लसीचा पुरवठा होत नाही. यात कांही राजकारण करायचे नाही. परंतू जी वस्तूस्थिती आहे, ती सांगत आहे. 

पिढ्याना-पिढया चांगल्या डॉक्टरांची निर्मिंती होईल

उस्मानाबाद येथे नव्याने सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात पिढ्याना-पिढया चांगले डॉक्टर निर्माण होतील. त्यामुळे आर्युविज्ञान संस्थेच्या निकषाप्रमाणे महाविद्यालयाची उभारणी करण्यात येईल.त्या मुळे  शासकीय  नियमाप्रमाणे१ते४श्रेणी अधिकारी कर्मचाऱ्यांना घेण्यात  येईल असे सांगितले

 
Top