तुळजापूरात  / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात मुंडन करून केंद्र सरकार व राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. 

  लातूर रोड चौकामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने  राज्य समन्वयक जीवनराजे इंगळे , महेश गवळी, कुमार टोले,औदुंबर जमदाडे, या मराठा बांधवांनी मुंडन करून केंद्र सरकार, व राज्य सरकार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी राज्य समन्वयक सज्जनराव  साळुंके, अर्जुन आप्पा साळुंके, प्रतीक( बप्पा) रोचकरी, राम चोपदार अशोक फडकरी, अजय (भैय्या) साळुंखे अण्णासाहेब क्षिरसागर, आबा कापसे, किशोर पवार, मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी व मराठा बांधव उपस्थित होते.

 
Top