तेर / प्रतिनिधी -
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर यांच्या पुढाकारातून उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाथ आश्रमात असणाऱ्या अपंग व मतिमंद मुलींना कीटचे वाटप करण्यात आले. ्या किट मध्ये एक नवीन टूथ ब्रश ,टूथपेस्ट ,सॅनेटरी नॅपकिन, सॅनिटायझर ,मास्क ,हेअर आली, कंगवा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे .
या दिव्यांग मुलींना याचा व्यवस्थित वापर करता यावा यासाठी सक्षणा सलगर यांनी पुढाकार घेतलेला आहे . राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर हा उपक्रम राबवणार आहोत . उस्मानाबाद जिल्ह्यातील दिव्यांग पालिकांनी ,तरुणींनी यासाठी संपर्क साधावा. असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर केले आहे.