उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

मागील काही महिन्यांपासून आपण सर्वजण covid-19 च्या संकटाशी सामना करत आहोत या संकटाशी सामना करत असताना प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत काही कार्य सुरू केले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे सेवाकार्य   या काळात महत्त्वाचे असल्याचे सांगून प्रशासनाला या कार्याचा नक्की फायदा होईल असा विश्वास अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवळे यांनी व्यक्त केला. त्या उस्मानाबाद येथे भारत विद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या covid- 19 विलगीकरण कक्ष उद्घाटन समारंभात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह एडवोकेट श्रीकृष्ण मसलेकर तसेच या  कोविड विलगीकरण केंद्रात सेवा देणारे डॉक्टर्स उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती आवळे पुढे म्हणाल्या की covid-19 च्या पहिल्या लाटेत आपल्या जिल्ह्यात अपुऱ्या आरोग्य सुविधा असून देखील केवळ सर्वांच्या सहकार्यामुळे आपण त्यावर मात करू शकलो आणि दुसऱ्याला लाटे वेळी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून उचललेल्या खारीचा वाट यामुळे या रुग्ण सुविधांमध्ये वाढ झाली. 

     राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या कार्याचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की ज्या नागरिकांना covid-19 ची बाधा झाली असताना घरात राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा विलगीकरण कक्ष उपयोगाचा ठरणार असून ज्या घरातील व्यक्तींना रोणा ची बाधा झाली आहे पण मुले सुरक्षित आहेत अशा मुलांचे संगोपन करण्यासाठी जनकल्याण समितीने सुरू केलेल्या बालसंगोपन कक्षाचे ही काम उपयोगी असल्याचे त्या म्हणाल्या.

    या कार्यक्रमात बोलताना विद्या भारती चे क्षेत्रीय पदाधिकारी श्री शेषाद्री डांगे यांनी या covid-19 विलगीकरण कक्षामध्ये दाखल झालेल्या नागरिकाला एकटेपणा जाणवणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले तसेच जे नागरिक संसर्ग झाला आहे म्हणून या विलगीकरण कक्षात दाखल होत आहेत त्यांच्या मनाची काळजी घ्यावी त्यांना आधार वाटावा असे वातावरण तयार करण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन केले.

 या विलगीकरण कक्षा मध्ये दाखल झालेल्या नागरिकाला मोफत चहा नाष्टा जेवण देण्यात येणार असून प्राणायाम आणि मनोरंजन वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे एडवोकेट महेंद्र देशमुख यांनी यावेळी सांगितले. तसेच covid-19 ची सौम्य लक्षणे आढळलेल्या रुग्णांना येथे दररोज वैद्यकीय तपासणी ऑक्सीमीटर द्वारे ऑक्सिजन पातळी तपासणी  केले जाणार असून ज्या रुग्णांना पुढील उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना ऑक्सिजन ची गरज भासल्यास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सह पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर आभार एडवोकेट सचिन सूर्यवंशी यांनी मानले. ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर अभय शहापूरकर भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड, आयुर्वेद व्यासपीठाचे वैद्य प्रशांत कोथळकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर अजित नायगावकर, अमोल सूर्यवंशी, तेरणा इंजिनिअरिंगचे प्राचार्य श्री माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top