परंडा / प्रतिनिधी- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा या महाविद्यालयांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या सेमीस्टर पद्धतीच्या ऑनलाईन परीक्षा सुरळीतपणे चालू झाल्या आहेत. दि.16 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या परीक्षा डॉ.  बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद या  विद्यापीठांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देत आहेत.महाविद्यालयांमध्ये प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड ,बाबासाहेब क्षिरसागर, अजित घुमरे यांच्यासह संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे समन्वयक अनिल जानराव हे परीक्षेचे कामकाज पहात आहेत.कला वाणिज्य व विज्ञान विभागातून दोन्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी बसलेले आहेत.या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालयांमध्ये आयटी समन्वयक म्हणून डॉ.प्रशांत गायकवाड,डॉ. संभाजी गाते ,डॉ.सचिन चव्हाण ,अनिल जानराव व अजित घुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा दक्षता पथक नेमले आहे ते महाविद्यालयामध्ये येऊन जे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देत आहेत त्यांच्या चौकशी साठी दररोज महाविद्यालयास भेट देत आहेत. संत गाडगेबाबा महाविद्यालयात  एकूण 160 विद्यार्थी परिक्षा देत आहेत तर शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे   महाविद्यालयातील 550 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. Covid-19 चे पालन करत सर्व परीक्षेचे कामकाज सुरळीतपणे चालू आहे.


 
Top