उमरगा / प्रतिनिधी-

मुरूम येथील स्वामी कॉम्प्लेक्स पाटी मागे असलेल्या राजू साठे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यामध्ये ६ व्यक्ति जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. १८) रोजी घडली आहे. नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझवली.

 रविवारी दि. १८ रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजणेच्या दरम्यान घरातील संपलेला गॅस सिलेंडर बदलून दुसरे सिलेंडर लावत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये राजू साठे गंभीर जखमी झाले आहेत. राजू साठे यांना पुढील उपचारासाठी उमरगा येथे नेण्यात आले आहे. इतर ५ व्यक्ती हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यात पृथ्वीराज मोरे (वय ७ वर्ष), माया युवराज पाटील (वय २६ वर्ष), छाया गजेंद्र साठे (वय २८ वर्ष), रेखा गजेंद्र साठे (वय ३५), सुमित्रा अशोक सूर्यवंशी (वय ५० वर्षे) या किरकोळ जखमी झाले आहेत. या स्फोटाने घरावरील पत्रे व त्यावरील लाकडे आगीत होरपळून गेले. घरी कांही दिवसांवर लग्न समारंभ असल्याने बस्ता ही बांधून ठेवण्यात आला होता. सदरील स्फोटाने अंदाजित ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मुरूम नगर परिषद अग्निशमन दलाचे पथक दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सदरील झालेल्या नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने मदत व्हावी अशी मागणी होत आहे.

 
Top