उमरगा / प्रतिनिधी-

कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदी  काळात गुलबर्गा- लातूर रोडवरील ट्रक चालक व वाटसरूसाठी औराद पाटी येथे मोफत नाष्टा पर्सलची सोय करुन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

 गुलबर्गा - लातूर मार्गावर सतत वाहनांची वर्दळ चालू असते. हा आंतरराज्यीय वाहतुकीचे मुख्य मार्ग आहे. सध्या महाराष्ट्रात ब्रेक द चैन अंतर्गत अनेक निर्बंध चालू आहेत. गुलबर्गा, आळंद येथून लातूर, उमरगा साठी मालवाहतूक होत असते. सध्या हॉटेल बंद असल्यामुळे ट्रक चालक व वाटसरूचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. हे सर्व पाहून हॉटेल सुजल व शिवराज ढाबा यांनी दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेत नाश्ता पार्सल व जारच्या पाण्याने पाण्याची बॉटल भरून देत आहेत. सकाळच्या वेळेत या भागातील ट्रक चालक व वाटसरूसाठी नाश्त्याची व पाण्याची व्यवस्था केली जात आहे.

आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून इंद्रजीत मेहत्रे व गणेश मिटकरी या हॉटेल व्यवसायिकांनी पदरमोड करून मोफत सोय केली आहे. यामुुळे वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 
Top