तुळजापूर / प्रतिनिधी

उस्मानाबादहुन बायपास मार्गी लातुरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप ने चौकात उभा असलेल्या इरटीगा सह  तुळजापूरहुन लातुरकडे  जाणाऱ्या कार मध्ये  समोरासमोर झालेल्या अपघातात सात वर्षाच्या मुलासह अन्य  तिघेजण  गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि २ रोजी  सकाळी ११.30 वा.सुमारास तुळजापूर नागपूर - रत्नागिरी महामार्गावर च्या बाह्यवळण रस्ता चौकात  घडली असुन गंभीर चार जखमी पैकी तिघांना सोलापूर हलवले आहे तर अन्य एकास उस्मानाबादला पाठवले आहे.

उस्मानाबादहुन बायपास मार्गी वायरींग घेऊन लातुरकडे  जाणारा पिकअप  क्र एम.एच. ०५ डी.के. ५९४१ याने  तुळजापूरहुन लातुरकडे निघालेली कार क्र .के.ए.०३ एन.डी.५३८५ सह  लातुर हून तुळजापूरकडे जाणाऱ्या व चौकात उभा राहिलेल्या इरटीगा क्र एम.एच.२४ ए.एफ.५८०८ या कार गाडीला समोरून जोराची धडक दिल्याने पिक चालक नागेश प्रकाश देवरे वर्षे ३५ रा मुरबाड, ता.शहापूर जि.ठाणे हा गंभीर जखमी झाला असुन त्यावर उपजिल्हा रूग्णालय तुळजापूर येथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी  जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद ,दाखल करण्यात आले तर कारमधील अमित बिराजदार ,अनिता तमके

हर्णेश अमित बिराजदार वय ७ वर्षे रा.लातुर सोलापूर येथे उपचारासाठी हलवले आहे .

या मार्गावर गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत परंतु संबंधित प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे


 
Top