उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेली मराठवाडयातील एकमेव नागरी सहकारी बँक उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद या बँकेने नुकतेच संपलेल्या २०२०-२१ या अर्थिक वर्षात दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर रुपये २८२९ कोटीचा बँकींग व्यवसाय टप्पा पुर्ण केला आहे.

सध्या जागतीक कोव्हीड-१९ सांसर्गीक महामारी सदस्य परिस्थिती असतांना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात अर्थिक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रात मंदीची लाट, गुंतवणुकीवरील व्याजदरामध्ये सातत्याने घट तसेच बँकेचे कार्यक्षेत्र असलेले महाराष्ट्र- व कनार्टक राज्यातील पाण्याची दुर्मिक्ष पारस्थिती/कोरडा दुष्काळ स्थिती असताना देखील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने विद्यमान चेअरमन श्री.ब्रिजलालजी  मोदाणी यांचे नेतृत्वाखाली आर्थिक प्रगतीमध्ये सातत्य ठेवून साल सन २०२०-२१ मध्ये (दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर) रुपये ४० कोटी पेक्षा अधिक नफा मिळविलेले आहे.

सध्या बँकेच्या महाराष्ट्रात २८ शाखा व कर्नाटक राज्यात २ शाखा अशा एकूण ३० शाखा कार्यरत आहेत. मुख्यालय उस्मानाबाद येथे ए.टी.एम. सुरु आहे. बँकेने कोअर बँकींग सोल्युशनचा अवलंब केला असून बँकने स्वतःच्या जागेत स्वतःचे डेटा सेंटर उस्मानाबाद येथे व डी.आर.साईट उदगीर येथे स्वतःच्या जागेत अद्यावत तंत्रज्ञानाने परिपुर्ण असे कार्यरत आहे.

सध्यस्थितीत बँकेकडे स्वमालकीच्या इमारती मुख्य कार्यालय- उस्मानाबाद, शिवाजी चौक लातूर, उदगीर, बार्शी, बीड, दत्तचौक सोलापूर, पंढरपूर, भुम, परंडा, चाटी गल्ली सोलापूर, उमरगा, नळदुर्ग, औराद (शहा.), अहमदपूर व मुरुम या १५ ठिकाणी आहेत. स्वमालकीच्या इमारत जागा झाल्यामुळे त्याठिकाणी अत्याधुनिक सोलार सिस्टीमसह अद्यावत आहेत.

अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानामळे बँकींग क्षेत्रात होत असलेले बदल स्विकारुन कोअर बँकिंग क्षेत्रात  होत असलेले बदल स्विकारून कोअर बँकिग कार्यप्रणाली आमलांत  आणलेली आहे. सदर तंत्रज्ञानाचा अचूक व पर्याप्त वापर करुन त्याचा उपयोग बँक व ग्राहकांना अपेक्षीत व गतिमान सेवा देत आहे.

ग्राहकाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक सुविधा देण्यावर भर दिला असून सेंट्रलाईजड क्लिअरिंग चेक्स, आरटीजीएस/एनईएफटी, एस.एम.एस. आदी अद्ययावत सुविधा सुरु केलेल्या असून, काेअर बॅकींग प्रणालीमुळे ग्राहकांना जलद सेवा देण्यात बँक अग्रेसर आहे. बँकेच्या संचालक मंडळाने एक पथदर्शी धोरण (व्हीजन) समोर ठेवून वाटचाल केल्यामुळे बँकेच्या व्यवसायात या पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे आणि बँक एका महत्वपुर्ण टण्यावर पोहंचत आहोत. रिझर्व्ह बँकेच्या अर्थिकदृष्टया सक्षम व उत्तम संचलित बँकांसाठीचे रिझर्व्ह बँकांचे निकष पालन केलेले आहे. तसेच बँकेच्या सभासंदाता साल सन २०११-१२ पासून सातत्याने सरासरी ८.००% लाभांश रिझर्व्ह बैंक आफ इंडिया यांच्या पुर्वपरवानगीने देत आहोत.

 संचालक मंडळाने सामाजिक हिताच्या महत्वपूर्ण उपक्रमाना एक सामाजिक जबाबदारी म्हणून उदात्त हेतुने सध्या जगात - देशात व राज्यात उदभवलेली कोरोना (COVID-१९) महामारी रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी बँकेच्या सर्व कर्मचारीवृंद कुंटुंबाच्या हितासाठी आरोग्य विमा प्रती व्यक्ती रु. ४.०० लाख प्रमाणे बॅक व्यवस्थापनाने घेतलेला असुन त्याचा आर्थिक लाभ सर्व कर्मचारीवृंद व त्यांच्या कुंटुबांना होत आहे.  तसेच बँकेने संशयीत बुडीत निधीमध्ये १५५ कोटीची तरतूद करुन, बँकींग क्षेत्रातील विविध आव्हांनाना तोड देत आहे. चालू अर्थिक वर्षात बँकेने रुपये १४ कोटी केंद्र शासनाला आयकर दिलेला असून बँकेच्या प्रगतीमध्ये सातत्य कायम राखत दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर ४० कोटीपेक्षा अधिक नफा मिळविलेला आहे.

 सहकारी बँकींग क्षेत्रात बहराज्यीय सहकारी बँक - उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि., उस्मानाबाद या बँकेने सर्व ग्राहक, ठेवीदार, कर्जदार सभासद यांना इतर व्यापारी बँकाप्रमाणे उत्कृष्ठ बँकींग सेवा -सेफ डिपॉझीट लॉकर, तसेच सर्व प्रकारची कर्जे व ठेवीच्या विविध योजना उपलब्ध करुन देऊन बँकेच्या प्रगतीची वाटचाल/घोडदौड कायम ठेवलेली असून ग्राहकांच्या सेवेत डेबीट कार्डद्वारे कॅशलेस/डिजिटल व्यवहार सुविधा देण्यात आलेली आहे.

 थकीत कर्जदारांनी बँकेच्या वसुली कार्यवाहीचा कटु अनुभव टाळण्यासाठी वेळेत कर्ज परतफेड करावी व बँकेच्या प्रगतीत हातभार लावणेबाबत अध्यक्ष बी. एस. मोदाणी यांनी आवाहन केलेले आहे. बँकेच्या या वाटचालीत बँकेचे अध्यक्ष श्री.बी.एस.मोदाणी, उपाध्यक्ष श्री.व्ही.जी.शिंदे, जेष्ठ संचालक श्री.व्ही.जे.शिंदे. इतर सर्व संचालक मंडळ सदस्य. मख्य कार्यकारी अधिकारी शोभा एम कर्मचारी यांचे बँकेचे प्रगतीमध्ये मोलाचे योगदान आहे.


बँकेची दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर अर्थिक स्थिती

सभासद संख्या -७३४५६

भाग भांडवल -रु.६३.९९ कोटी

निधी -रु.३१०.९५ कोटी

ठेवी -रु.१७४९.७७ कोटी

कर्जे -रु.१०७९.२२ कोटी

गुंतवणुक - रु.१००५.९२ कोटी

नफा-  रु.४०.१८ कोटी


 
Top