कळंब - ( शिवप्रसाद बियाणी

 ”आता आमचं ठरलंय,... आमच्या गावात कोरोना रग्न सापडणार नाही.” कोरोना महामारीवर येथील दोस्ती तुटायची नाय....ग्रुप चे वतीने जनजागरण मोहीम हाती घेतली आहे.या साठी च्या नियमावलीचे स्टिकर चे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.

  कळंब येथील दोस्ती ग्रुप च्या वतीने समाज बदला  साठी चे  अनेक उपक्रम आतापर्यंत राबवण्यात आले.गेल्या वर्षी कोरो ना च्या काळात पालावरच्या तसेच ऊस तोड कामगारांना किराणा साहित्य,मास्क व कपड्यांचे वाटप करण्यात आले होते.या ग्रुप चे महाराष्ट्र व  बाहेर एकूण सत्तर सदस्य आहेत.कळंब  येथील दहावीच्या 1988 च्या बॅच च्या  मित्रांनी एकत्र येवुन ,या ग्रुप ची स्थापना केली होती.या ग्रुप ने अनेक समाज हिताचे उपक्रम राबविले आहेत.त्या मुळेच न.प. ने स्वच्छ ता दुत म्हणून ही नेमले आहे,या ग्रुप च्या उपक्रमाची दखल घेत,कळंब तालुका पत्रकार संघा ने समाज सलोखा हा मानाचा पुरस्कार देवून गौरव केला आहे.

     ग्रुप  च्या वतीने वाचन चळवळी ला बळ मिळावे म्हणून, वाढदिवसानिमित्त पुस्तकांची भेट देण्यात येते,ज्येष्ठ मंडळींना  धार्मिक ग्रंथ देवून सन्मानित केले ,या साठी पुणे येथील ग्रुप सदस्य हरी भाऊ कळंबकर यांनी शंभर ग्रंथ भेट दिले होते. पाथर्डी येथील चारा छावणी वरील शेतकऱ्यांना आई च्या वाढदिवसानिमित्त भैया बावीकर यांनी अन्न दान केले होते.भाट शिरपरा येथील जलसंधारण कामावरील  नागरिकांना एक महिनाभर पाण्याचे वाटप केले,एक शाळा दत्तक घेवून त्या शाळे साठी साहित्य ही दिले होते.शहर स्वचछतेसाठी पुढाकार,वर्तमान पत्र वाटप करणाऱ्या मुलांना मास्क, व  टोप्या चे वाटप. या सारखे अनेक उपक्रम राबवून वेगळी ओळख  निर्माण केली होती.

    या वर्षी पुन्हा कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे, घबराटीचे वातावरण आहे.पण काळजी घेण्याची गरज आहे,या साठी च ग्रुप  च्या वतीने  आता आमचं ठरलंय....माझे कळंब कोरोना मुक्त करण्या साठी,शासनाच्या  नियमाचे पालन करणार,मास्क घालणार,कामा शिवाय बाहेर पडणार नाही,हात धूनार,अंतर ठेवणार...हे सूत्र वापरण्या साठी स्टिकर चे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.या वेळी ग्रुप  सदस्यांनी ही काळजी घ्यावी,व सर्वांना काळजी घेण्यासाठी,लस घेण्या साठी  जन जागरण करावे,असे आवाहन ही डॉ. प्रमोद हतागळे यांनी केले.

    आम्ही कळंब कर असून, माझ्या गावात या पुढे एक ही कोरोना बाधित रुग्ण आढळणार नाही,...असा आत्मविश्वास ही सर्वांनी व्यक्त केला.


 
Top