कळंब / प्रतिनिधी : -

कळंब शहरातील ढोकी रोड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये नवीनच दाखल झालेल्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतल्याने  मोठे नुकसान झाले,गाडी मध्ये कुणी रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

 ही रुग्णवाहिका बार्शी येथून रुग्ण सोडून परत येत होती,शहरातील महावितरण कार्यालयासमोर आली असता, गाडीच्या समोरील भागातून अचानक धूर निघत असल्याचे नागरीकांच्या लक्षात आले असता, त्यांनी  चालकाच्या निदर्शनास  आणून दिले व गाडी थांबवली. हे  चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने रुग्णवाहिेका तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवली.  ह्या रुग्णवाहिकेचा चा थरार कळंब येथील महावितरण कार्यालयाच्या समोर दुपारी दोन  वाजेच्या सुमारास घडला.या घटनेने या भागातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.रत्याच्या कडेला असलेल्या लोकांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

    ही घटना पोलिसांना समजताच पथक घटनास्थळी दाखलझाले.नगरपरिषदेच्या आग्निशमन दलाचे ही घटनास्थळी पाचारण केल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी यश आले.


 
Top