कळंब / प्रतिनिधी - 

 शहरातील उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसर येथे दि.११ एप्रिल रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेवक सुनील गायकवाड,रिपाईचे बंडू बनसोडे, शिवाजी शिरसाट,भाजपचे सतपाल बनसोडे,लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,  बालाजी निरफळ,ज्ञानेश्वर पतंगे, शिवप्रसाद बियाणी,मुकेश गायकवाड,शितलकुमार धोंगडे,ओंकार कुलकर्णी उपस्थित होते.

 
Top