कळंब / प्रतिनिधी - 

सध्या कळंब तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.तरी उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे अवघे तीस ऑक्सिजन बेडचे व दहा व्हेंटिलेटर असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कृष्णा हॉस्पिटल डिकसळ या ठिकाणी पंधरा  ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा उदभवत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता ही सर्व यंत्रणा कमी पडत आहे. त्यासाठी कळंब तालुक्यात तात्काळ पुरेशी ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर सुविधा असलेले कोविड सेंटर उभारण्यात यावे,त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची सोय होईल अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम यांनी मा. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

     निवेदनावर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम व दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 
Top